About Us

लेखिकेचा परिचय
नाव :- राजश्री शिवाजीराव जाधव – पाटील
शिक्षण :-
१.प्राथमिक शिक्षण :- आदर्श बालक मंदिर, इस्लामपूर
२.माध्यमिक शिक्षण :- इस्लामपूर हायस्कूल इस्लामपूर
३.कॉलेज :- कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज,इस्लामपूर

कार्यरत :- नियंत्रक , डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ,दापोली

*भूषविलेली पदे :-
१.पोलिस निरीक्षक (२००९)
२.महाराष्ट्र वित्त व लेखा अधिकारी वर्ग ‘अ’ पदी निवड २०१०
३.मुख्यलेखापरिक्षक सांगली ,मिरज,कुपवाड महानगरपालिका ,२०१०
४.वरिष्ठ लेखाधिकारी , जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (२०११)
५.उपकुलसचिव,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर (२०१५ ते २०१८)
६.उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी, सातारा जिल्हापरिषद (२०१८ ते २०२१)
Email :- rajsuryanamaskar@gmail.com
फोन नंबर :- 9765874903
पत्ता :- बहे रोड,इस्लामपूर राजेबागेस्वार मंदिराच्या मागे,तालुका वाळवा, जिल्हा सांगली,पिन.४१५४०९
शिक्षण :- पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र)
योग शिक्षक (योग विद्या धाम,नाशिक )
शाहिरी प्रमाणपत्र कोर्स (शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर)
निवड:- पोलिस उप.निरीक्षक (२००९)
संस्थापक सदस्य :- राजर्षी फाऊंडेशन,इस्लामपूर
संस्थापक अध्यक्ष :- बेबीस्टेप फाऊंडेशन,इस्लामपूर
संस्थापक सदस्य :- ड्रीम अँडव्हेंचर , छत्रपती संभाजीनगर
सूर्यनमस्कार मधील वैयक्तिक कामगिरी :-
आंतरराष्ट्रीय योग महासंघ तर्फे सूर्यनमस्कार चॅम्पियनशिप स्पर्धेत २२ जानेवारी २०२३ रोजी सलग अकरा तासात २०७६ इतके सूर्य नमस्कार पूर्ण करून सूर्यपुत्री हा पुरस्कार सलग दुसऱ्या वर्षी मिळवला,यापूर्वी २०२२ या वर्षी १११० सूर्य नमस्कार पूर्ण करुन सुर्यपुत्री हा पुरस्कार मिळवला होता.
फेसबुकवर व व्हॉट्स ॲपवर ७२००० पेक्षा जास्त सदस्य सूर्यनमस्कार चळवळी मध्ये सहभागी.
गिर्यारोहण क्षेत्रातील कामगिरी :-
भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२२ रोजी दक्षिण आफ्रिका खंडातील (टांझानिया देशातील ) सर्वोच्च शिखर माऊंट किलीमांजारो सर केले.
मनाली,हिमाचल प्रदेश येथे BMC कोर्स पूर्ण
सह्याद्री मधील तोरणा,सिंहगड,राजगड,रायगड ,अलंग,मलंग,तैलबैला सुळका, हिरकणी कडा,प्रतापगड, सारखे किल्ले सर
सह्याद्रीमध्ये चढाईस कठीण मानला जाणारा लिंगाणा सुळका दोन वेळा सर करणेत आला.
महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च २०२२ रोजी हिरकणी कडा सर
कळसूबाई शिखर पाच वेळा सर
सिक्कीम येथील माऊंट dizongari हे शिखर सर केले.
*मनाली,हिमाचल प्रदेश येथील माऊंट पतासलु हे १२००० फुटावरील शिखर सर केले.
*मनाली हिमाचल प्रदेश माऊंट हनुमान तिब्बा या शिखर मोहिमेत सहभाग
*लडाख येथील माऊंट कांगस्त्ये शिखर मोहिमेत सहभाग
क्रीडा क्षेत्रातील कामगिरी
*क्रीडा क्षेत्रातील कामगिरी
राष्ट्रीय स्तरावरील अथलेटीक स्पर्धेत सन २०१८,२०१९,२०२१ या वर्षी अनुक्रमे मुंबई,गोवा आणि हैद्राबाद येथे झालेल्या ५००० मीटर चालणे या स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त.
१० व २१ किमी मॅरेथॉन स्पर्धेत २५ हून जास्त वेळा सहभाग
* ३० एप्रिल २०२३ रोजी कास अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत ५० किमी अंतर पूर्ण.
०२ एप्रिल २०२३ रोजी झालेल्या कराड येथील कृष्णा मॅरेथॉन स्पर्धेत १० किमी मध्ये द्वितीय क्रमांक
लेखन क्षेत्र :-
ब्लॉग लेखन, काव्यलेखन, ललित लेखन
ही श्री ची लेखणी हे ललित लेखन वरील पुस्तक प्रकाशित.
सामाजिक क्षेत्र :-
राजर्षी शाहू फाऊंडेशन,इस्लामपूर , टीम बेबीस्टेप इस्लामपूर तर्फे सातत्याने ग्रामीण भागात गरजू मुला मुलींना शैक्षणिक मदत