सूर्यनमस्कार आणि सातत्य….सूर्यनमस्काचे अनुकूल फायदे जाणण्यासाठी या अभ्यासात सातत्य असणे ही अट आहे.तसेच सूर्यनमस्कार ची सर्वप्रथम गुणात्मक प्रगती म्हणजे सूर्यनमस्कार प्रत्येक अवस्था काळजीपूर्वक करून पाहणे आदर्श अवस्था आत्मसात करणे आवश्यक आहे शिवाय श्वास कधी घ्यायचा कधी सोडायचा याबद्दल देखील योग्य ती दक्षता घेतल्यास आपल्याला अनुकूल परिणाम जाणवतात.

    सूर्यनमस्कार सातत्य राहणे ही गोष्ट अवघड जरूर आहे मात्र अशक्य नाहीये.काही लोक मोठ्या हिरीरीने सुरवात करतात मात्र काहीच दिवसात किंवा  महिन्यात त्यांचे सूर्यनमस्कार अभ्यासात सातत्य राहत नाही.चार पाच दिवसांचा गॅप पडला तर पुन्हा बारा,चोवीस सूर्यनमस्कार करून पुन्हा सूर्यनमस्कार अभ्यासाला सुरुवात करायला हवी . सूर्यनमस्कारामध्ये विशिष्ट असा संकल्प केल्यास देखील सूर्यनमस्कारामध्ये सातत्य राहते ग्रुप मध्ये राहून सूर्यनमस्कार केल्यास सातत्य राहते शिवाय एकदा का आपल्याला सूर्यनमस्काराच्या अनुकूल परिणामांची प्रचिती आली की सूर्यनमस्कारामध्ये सातत्य राहते व्यायामाच्या अभावी वयोमानानुसार गुडघेदुखी, अंगदुखी, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे अशा समस्या उद्भवता मात्र सूर्यनमस्कार मध्ये सातत्य असेल तर आजारापूर्वीच तो होऊ नये याबद्दल दक्षता घेतल्यासारखे आहे अशी खूप सारी कारणे आपल्याला माहीत असतील तर जरूर आपले सूर्यनमस्कार सारख्या सर्वांग सुंदर अशा व्यायाम प्रकारात सातत्य राहू शकते मी आज तीन किलोमीटर चालणे आणि 108 सूर्यनमस्कार केले आणि तुम्ही ? ? ?

#सूर्यनमस्कार
#१०८सूर्यनमस्कार
#सर्वांगसुंदर_व्यायाम
#अक्षय_आरोग्य
#stayfit
#अक्षय_संकल्प

Leave a Comment