सूर्यनमस्कार आणि बळकट हृदय

सूर्यनमस्कार बद्दल सर्वात महत्त्वाचा फायदा कोणता असेल तर आपली ह्रदयभिसरण आणि रक्ताभिसरण अभिक्रिया सुधारते.बळकट हृदय म्हणजे काय अशी व्याख्या कशी करायची ? काहीना वाटते की आपण आपला श्वास जास्त वेळ रोखून धरू शकलो किंवा मग खूप फास्ट पळून दम लागला नाही तर हृदय बळकट आहे असा अर्थ घेतात मात्र आपण पाहतो कधीकधी जिम मध्ये किंवा cardio work out करताना अचानक हार्ट अटॅक येऊन लोक तिथेच कोसळतात किंवा कित्येक धावपटू धावताना हार्ट अटॅक चे शिकार होतात म्हणजे हृदय बळकट व्हायला रोज व्यायाम करत आहे हे कारण पुरेसे नाहीये तर तो व्यायाम कोणता,कसा आणि किती वेळ करत आहे याला खूप अर्थ आहे.पूर्ण एप्रिल आणि मे महिन्यात शिवाय अलीकडे उष्णतेचा पारा खूप वाढत असताना फास्ट रनिंग ,cardio workout सारखे व्यायाम प्रमाणात करणे गरजेचे आहे मग या महिन्यांमध्ये सूर्यनमस्कार सारखा व्यायाम मध्यम गतीत करणे फायदेशीर ठरते त्याबरोबर श्र्वासोश्वास नियमन सह प्रत्येक सूर्यनमस्कार केल्यास आपली ह्रदयभिसरण तसेच रक्ताभिसरण अभिक्रियेवर खूप जास्त अनुकूल परिणाम होतात आणि आपले हृदय खऱ्या अर्थाने बळकट होते.आजच्या काळात आपण पाहतो हार्ट पेशंट चे प्रमाण सर्दी खोकल्याच्या पेशंट सारखे वाढलेले आहे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून तुम्ही सूर्यनमस्कार या सर्वांगसुंदर व्यायामाची कास धरू शकता….

आज मी १०८ सूर्यनमस्कार केले . आणि तुम्ही ? ? ?

©राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील
११/०५/२०२४

#सूर्यनमस्कार
#सर्वांगसुंदर_व्यायाम
#१०८सूर्यनमस्कार
#अक्षय_संकल्प
#अक्षय_आरोग्य
#stayfit

Leave a Comment