एका पोलिसाशी पंगा

#सिंधुदुर्ग_डायरीदिनांक ०३ मे २०२४
दीर्घ सुट्टी वरून सिंधुदुर्ग नगरी मध्ये जिल्हापरिषद येथे कॅफो या पदावर दोन मे ला हजर झाले एक छोटेखानी घर देखील भाड्याने लगेच मिळाले परस्पर दापोली वरून काही  साहित्य शिफ्ट केले होते मात्र निम्मे साहित्य इस्लामपूर येथे होते तर तात्पर्य याच कारणासाठी परत इस्लामपुरात येऊन सर्व साहित्य घेऊन जाणे भाग होते ओघाने मतदान करायला सुट्टी होतीच एकाच दिवसाच्या रजेचा विषय होता पण चार दिवस तिथे आणि काय करू असा विचार करून एक दिवसाची रजा मागितली आणि मिळाली देखील पाचेक वाजता ऑफिसमधून बाहेर पडले सिंधुदुर्ग बसस्टँड वर एकमेव गाडी आमच्या देखत निघाली होती ड्रायव्हर बोलले आता लवकर गाडी नाही येणार पण त्या गाडीत गर्दी आहे तुम्हाला नाही चढता येणार मी त्यांना बोलले तुम्ही गाडी थांबवा मी चढू शकते मग काय अर्धा एक किमी गाडीचा पाठलाग करून गाडी थांबवली बस ड्रायव्हर चांगले होते  मालवण पर्यंत जायचे होते  गाडी इतकी फुल होती की दरवाजाच्या पायरीवर पण प्रवासी उभे होते मुळात पायरीवर उभारलेल्या लोकांना मी आत पण येऊ शकत नाही असे वाटले मात्र गर्दीत शिरकाव करण्याचा मला चांगलाच अनुभव असल्याने मी केवळ गर्दीत चढले नाही तर ड्रायव्हर यांनी त्यांच्या कडेला बसलेल्या स्त्री प्रवाशाला मला जागा देण्याबद्दल सांगितले आणि त्या जागेवर मी स्थानापन्न देखील झाले ड्रायव्हर यांनी कोकणी भाषेत माझ्या पलीकडील लेडीज ना  मी इथली नाही ते पाहुणे आसा आपल्याला मदत करणे भाग आसा असे सांगितले मग मी पण सांगलीची आहे अशी ओळख करून दिली पाच वाजून गेले असताना ऊन मी म्हणत होते ते बस मध्ये केबिन मध्ये बसल्याने भाजून काढत होते. मी डोळ्यावर गॉगल चढवला आणि सूर्याचे चटके सहन करत बसलो.अर्ध्या पाऊण तासात मालवण आले स्टँड वर उसाचा रस पाहिला आणि तिथे जाऊन चांगले दोन ग्लास बर्फ न घालता रस पिला थोड थंड वाटल्यावर कोल्हापूर गाडीसाठी फलाट वर रवाना झाले.कोल्हापूर गाडी जवळपास पाऊण तासाने आलो तर त्या गाडीकडे त्या स्टँड वरील सर्वच माणसे कोल्हापूरला निघाल्यासारखी धावली अर्थात त्यामध्ये मी पण होते माझ्याकडे अवजग बॅग नेहेमीप्रमाणे होती मला एक गोष्ट नेहेमी कळतं नाही असुदे लागेल म्हणून नको ते साहित्य पिशवीत भरून इकडे तिकडे फिरवत राहायचे माझे वेड कधी संपणार आहे.तर असो पुढे असे झाले की प्रचंड गर्दीत मी निम्मे लोक चढल्यावर चढले त्यांनी मोक्याच्या जागा पटकवल्या होत्या तिसऱ्या सीटच्या खिडकीबाहेर एक पोलिस त्या सीटवर बॅग टाकून उभा होता मी पोलीस आहे हे बघून मागेच निघाले होते पण मला वाटले एकच सीट असणार म्हणून त्या सिटकडे बसायला निघाले तर त्या पोलिसाने एकदम अरेरावी करतात तसे ओ मॅडम इथे बसायचे नाही कळले का असे बोलले.मला असा अरेरावी पना सहन झाला असता तर शांततेचे नोबेल प्राइज मलाच मिळाले नसते का मी त्या पोलिसाला न जुमानता त्या सीटवर बसले तो पोलीस ओ उठायचं काय …कळलं का उठा लगेच असे म्हणत बस मध्ये चढायला लागला तो येईपर्यंत एक मुलगा आला मला विचारले इथे कोण बसले आहे मी म्हणाले खिडकीतून त्या पोलिसांनी बॅग ठेवली आहे मग तो पण येऊन माझ्या पलीकडे बसला बस मध्ये खूप गर्दी होती आता त्या पोलिसाची बायको आणि लहान मुलगा चढला तो पोलीस आता त्या माझ्या पलीकडे बसलेल्या मुलाला उठवायला लागला तो बोलला गर्दीतून आलो आहे तुम्ही खिडकीतून बॅग टाकली असल्याने उठणार नाही आता तो पोलीस मला बोलला ओ मॅडम तुमच्या मुळे झाले हे मी बोलले अनावश्यक काहीही बोलू नका त्या मुलाला मी बसायला सांगितले नाही आणि माझ्याशी सरळ न वागल्याची किँमत आहे ही.मग तो पोलीस असाच बडबडत होता त्याच्याकडे सर्व्हिस रिव्हॉल्व्हर देखील अडकवली होती म्हणून त्याला इतर लोक घाबरत होते बहुदा तो दोन वेळा मला बोलला लेडीज असून तुम्हाला काही वाटलं नाही.माझ्या पलीकडे असलेला मुलगा काही उठला नाही त्याला मी उठ असे काही बोलू शकलो नाही आणि मी पण काही उठलो नाही त्या पोलिसाची बायको असू दे तुम्ही जावा उतरा खाली पुढे तुम्हाला जागा मिळेल असे बोलली मला थोड वाईट वाटले नाही असे नाही मात्र त्या पोलिसाने मला अरेरावी करून मानेला हिसका देऊन मागे जायचं काय असे बोलला नसता तर मी पण सौम्य वागलो असतो पोलीस असलास म्हणून काय झाले या विचाराने मी त्या जागेवर बसले तो बस मध्ये उतरला तेंव्हाही माझ्याकडे रागाने बघत होता मी त्याकडे न बघता दुसरीकडे बघत बसले पुढील स्टॉप वर बस रिकामी झाली त्या पोलिसांच्या बायकोला जागा पण मिळाली पण तो पोलीस आता मला कधीही विसरणार नाही पण यामध्ये माझे काही चुकले आहे असे मला वाटले नाही असो…पण आता पुढील वेळी तो नक्कीच आपल्या बायकोची जागा पकडायची तर खिडकीतून बॅग टाकून नक्कीच पकडणार नाही
©राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील
#सिंधुदुर्ग
#प्रवासी_कथा

Leave a Comment