निमताचा मंगळवार

आम्ही शाळेत असताना सोमवार किंवा मग रविवार पासून मंगळवार जवळ आला आहे आणि निमताचा मंगळवार होऊ देऊ नका असे मम्मी दात ओठ खाऊन आम्हा तिघांना म्हणजे मला , तायडी आणि बिट्या ला बोलायची
त्यामानाने तायडी कामसू
आज्ञाधारी आणि मम्मी पप्पांच्या शब्दांच्या बाहेर नसल्याने मंगळाचा धोका विशेष करून मला आणि बिट्याला असायचा पण बिट्या भीतीच्या छायेखाली वावरायचा पण मी नेहेमी निर्भिड असायचो
खूप लहानपणापासून म्हणजे आगरकर हे नाव मला माहीत नसल्यापासून इश्ट असेल ते बोलेन आणि साध्य असेल ते करेन या विचाराने मी वागत असल्याने मम्मीच्या रागाचे शंभरावे कारण भरायला त्यामध्ये माझ्या बद्दल एकूण 89 कारणांचा समावेश असायचा तायडी चे एखादे कारण आणि बिट्याची उर्वरित दहा अश्या प्रचंड आणि आसुरी कारणामुळे या मंगळवारी मम्मी आम्हाला मारायला फोकाची काठी म्हणजे ती अगदी ओली आणि वळ उठवणारी काठी असायची त्याचा पहिला प्रसाद मम्मीच्या अंगात पूर्ण ताकद असेपर्यंत मला मिळणार आणि उर्वरित त्या दोघांच्या वंचित आघाडीला असे अलिखित ठरलेले असायचं.सोमवारी रात्री मी मंगळवार साठी माझ्याच मनात प्लॅन तयार करायचो
तायडी बीट्या कधी कधी काहीही लक्षात राहायचं नाही
मात्र माझे मम्मी घरातून बाहेर पडली तर गोठ्याकडे काठी काढायला गेली आहे की दुसरीकडे कुठे अस माझं लक्ष असायचं.मी त्या दोघांना आज मंगळवार आहे असे कधीही सांगायचो नाही
कारण मम्मीने काठी काढल्यावर तिला पहिला जर मी सापडलो नाही तर बिट्या चालायचा तो पण नाही सापडला तर मात्र तायडी च्या अंगावर एखादा वळ उठायचा पण ती कधीही रडायची नाही
ती महात्मा गांधी यांच्या मार्गाने जाऊन असहकार चळवळ पुकारायघी
बिट्या मार खाताना रडायचा
आणि मी न रडता इतक्या मोठ्याने ओरडायचो की शेजारी आमच्या घरी यावेत आणि आमची सुटका असावी अशी माझी strategy असायची
योगीताची आई येणार असतील तर मात्र त्या हमखास मिसरी लावत असताना हातातली मिसरी पूर्ण घासून झाल्याशिवाय आम्हाला मम्मी पासून सोडवायला यायच्या नाहीत
एक दोन शेजारी मम्मीला घाबरणारे त्यामुळे ते मध्ये पडायचे नाहीत
दोन तीन शेजारी माझ्यावर खार खाऊन राहणारे त्यामुळे ते येऊन आनंदी चेहऱ्याने मारहाण पाहायचे
मी शक्यतो मम्मीच्या तावडीत नाही सापडायचो
मम्मीने काठी काढली आहे अशी आगाऊ सूचना मिळाली की मी भूमिगत व्हायचो कधी कधी बाहेर पडताना मम्मी मला राजे जाग्यावर थांब असे म्हणून stachu द्यायचा प्रयत्न करायची मात्र मी पळून जायचो कधी कधी ती मला ये राजीला धरा धरा म्हणत किमान दोन एक किमी पाठलाग करायची तेंव्हा मम्मीचे वय अंदाजे तीस असायचे आणि ती जवळपास सहाच्या पेस ने मला तानायची त्या काळी मॅरेथॉन स्पर्धा असत्या तर आता वाटते आमचं घर मम्मीच्या मेडल ने भरले असते
पण नव्हत्या ते आमचं दुर्दैव
पळताना मम्मीला मी सापडलो तर माझे हाल कुत्र पण नाही खायचे लाथा आणि बुक्की देत मम्मी घरला फरफटत न्यायची आणि बाजूला चाळीतील बारकी पोर
काही लहान मुले माझा आदर्श घेणारी असल्याने
त्यांना मला देखील मार बसतो हे बघून त्यांचे बाल मन अस्वस्थ व्हायचे
खूप वेळ मी मम्मीला सापडायचो नाही आणि मी पूर्ण मंगळवार शेजाऱ्यांच्या घरात बसायचो तिथे पण मम्मी येईल का धास्ती असायची.मम्मी न चुकता मंगळवारी काठी का काढायची याबद्दल मी आता तिला विचारेन काय बोलते हे बघून सांगतो तुम्हाला
पण तुम्हाला म्हणून सांगतो
आम्हाला मम्मी  काळ निळ पडेपर्यंत मारायची आणि  आणि रात्री सुजलेल्या तोंडाने आणि हाताने
जेवावे लागायचे
जेवताना तोंड दुखायचे
रडू अनावर व्हायचे
अश्यावेळी मम्मी मला एक वाक्य बोलायची
एवढं मारतोय तर आस वागतोस रेड्या आणि नसतं मारलं तर जग विकून आली असतीस
मला रडता रडता
आपण कोंबड्या विकायला जातो तसे  एका नायलॉन च्या पिशवीत जग घालून विकायला निघालो आहे असे इमॅजिन करायचो….


विशेष टीप
आज योगायोग हा आहे की आज मंगळवार आहे.

Leave a Comment