Short Connectionनेपाळ वरून परत येताना डायरेक्ट मुंबई flight ticket फारच महाग होते मग साहजिकच व्हाया दिल्ली मार्गे यायचे तिकीट बुक केले अर्थातच एकच कंपनीचे पुढील विमान होते आणि असे असले तरीही शॉर्ट कनेक्शन कालावधीतील फास्ट हालचाल मलाच करणे क्रमप्राप्त होते.काठमांडू ते दिल्ली असा प्रवास पूर्ण दोन तासांचा देखील नाहीये दिक्कत कुठे होते आता मला दिक्कत साठी व्यवस्थित मराठी शब्द सापडत नाहीये तर दिक्कत कुठे होते तर विमान थांबल्यावर सर्व प्रवासी अध्ये मध्ये शिरून आपल्याच बॅगा एकमेकांच्या पायात मध्ये आणून जो अभूतपूर्व गोंधळ घालतात तिथे दिककत.एकदा दोनदा शॉर्ट कनेक्शन वाल्यासाठी अशी घोषणा झाली की भारतात निवडणुका असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशातून येणाऱ्या बॅग कस्टम ड्युटी कडून तपासून पुढे जातील म्हणजे त्या आपल्या आपून घ्यायच्या तपासून आणि पुढे चेक इन काउंटर ला जमा करायच्या दिल्ली काठमांडू विमानप्रवास मध्ये माझ्या पलीकडे नेपाळ मधील एक Government finance officer बसल्या होत्या आणि त्या ट्रेनिंग साठी दिल्लीला चालल्या होत्या त्यांचा नाश्ता त्या वारंवार मला ऑफर करत होत्या मी नम्रपणे नकार दिला तरी salty है,टेस्टी है असे म्हणत होत्या मग न राहून न काजू घेतला तर त्यांचे पुढे असे की एक से क्या होगा मग हे कुकीज पण छान लागते असे करत ते पण त्यांनी मला दिले तरीही मला माझ्या पुस्तकातील एक इंटरेस्टिंग कथा पूर्ण करायची होती म्हणून मी खात खात वाचत होते मग मी खाल्ल्या मिठाची जाणं ठेऊन काहीतरी विचारायचे म्हणून विचारले काठमांडू ला फिरायला गेला होता का तर त्या उत्तरल्या मी काठमांडू मधील असून दिल्लीला ट्रेनिंग ला निघाले आहे मग मात्र मी पुस्तक मिटवले आणि बोलू लागले मग आमची नोकरी सेम पद्धतीचे यावर आमचे मत जुळले,मग नेपाळ भारत तुलनात्मक बोलणे झाले आणि त्यांची थोडी जाडी बघून मी त्यांना बोलले तुम्हाला सूर्यनमस्कार माहीत आहे का ? मग त्यांनी जुजबी माहीत आहे असे सांगितले मग जवळपास अर्धा तास मी त्यांना सूर्यनमस्कार बद्दल त्या प्रभावित होतील अशी माहिती सांगितली आणि अर्थातच त्या सूर्यनमस्कार करायला तयार देखील झाल्या.मग फोन नंबरची देवाणघेवाण झाली मग मी त्यांना गमतीने बोलली तुम्ही आज प्रवासात मला जेवढ्या कॅलरी खाऊ घातल्या त्याच्या कित्येक पटीने मी तुमच्या कॅलरी बर्न करेन…मग दोघीही खळखळून हसलो.
   तर आता ज्यावेळी शॉर्ट कनेक्शन बद्दल annoucment झाली त्यावेळी मी त्यांना माझी पुढील Flight दोन अडीच तासांच्या अंतराने असल्याचे सांगितले मग त्यांनीही माझ्यासाठी काही प्रवाश्यांना थोपवून धरायचे काम करायचे ठरवले खरेतर त्याची गरज नव्हती मात्र त्या बोलल्या आप आगे जाओ मैं संभालती हुं…तर त्यांचे नाव मी विसरले फोन नंबर save करताना लिहिलं आहे पुन्हा आठवेल…मी आठव्या सीट वर होते आणि विमान थांबल्यावर  सगळे बसले असताना माझी बॅग घेतली आणि पुढे येऊन एअरहोस्टेस समोर उभी ठाकले त्यांना माझ्या शॉर्ट कनेक्शन flight बद्दल सांगितले त्यांनी मला बाहेर उभा माणूस सर्व ती मदत करेल असे सांगितले विमानाचे दार उघडले बाहेर पडणारी पहिली व्यक्ती मीच होते मी त्या माणसाला सांगायला गेले त्याने तर हात झटकले मग ठरवले ज्या काही वेगवान हालचाली करायच्या त्या आपल्यालाच कराव्या लागतील मग तत्काळ imigration काउंटर कडे रवाना झाले फ्लोटेड मार्गावरून मी अक्षरशः धावत होते मग imigration साठी खूप मोठी रांग मग मध्ये नाही का एक बाई मंदिराच्या रांगेत अंगात आले म्हणून पुढे पुढे जाते आणि इतर लोक बाजूला होतात त्याच तडफेने त्या लाईन मध्ये शॉर्ट कनेक्शन flight असे म्हणत पुढे पुढे गेलो ते डायरेक्ट त्या अधिकाऱ्यांसमोर पोहचलो मग काय त्या अधिकाऱ्याला माझा नाहक संशय वाटला माझे पासपोर्ट आमचे पप्पा माझे प्रगती पुस्तकं ज्या आत्मियतेने आणि रागाने बघायचे त्या उत्सुकतेने ते बघत होते मग काही काळाने त्याला शिक्का हा मारावा लागणार होताच मग त्याने उपकार केल्यासारखे दोन मिनिटांनी माझे पासपोर्ट मला दिले.आता माझ्या अफझलखान एवढ्या बॅग कडे मी रवाना तर शॉर्ट कनेक्शन चां टॅग मिरवत माझी बॅग एकटीच गोल गिरक्या घेत होती मग एक ट्रॉली घेतली आणि टर्मिनल तीन वरून दोनच्या दिशेने धाव घेतली ,धाव म्हणजे अक्षरशः मध्ये कोणाला पण येऊ दिले नाही म्हणजे नाहीच …कोणी मध्ये आले तर शॉर्ट कनेक्शन flight एवढेच एक वाक्य तोंडात….चेक इन काउंटर ला अफझलखान ला जमा करताना ती बाई विचारत होती बॅग मध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत का? असेल तर मिळणार नाही मी no असे सांगताना मनात बोलले चुकून निघाले तर मला काय ही बॅग नको उचलून उचलून मरण्यापेक्षा हा अफझलखान बेवारस पडून राहूदे कुठेतरी.मग अर्थातच सिक्युरिटी चेकिंग वेळेत झाले आणि सुस्कारा सोडला तेंव्हा माझ्याकडे निवांत असा तब्बल पाऊण तास राहिला होता….
   तर शॉर्ट कनेक्शन कालावधी बद्दल मी आता विचार करते तर आपल्या आयुष्यातील कामाचा उरक व्हायला ही क्लृप्ती करून पहा खूपच कमी वेळ राहिला आहे असे गृहीत धरून जेवढी होतील तेवढी पटपट सर्व पेंडींग कामे करायचं ठरवा…..तर सालाबाद प्रमाणे हे ब्लॉग वरील लेखन म्हणून वाचून तसेच सोडून न देता reply जरूर द्या….कारण लिखाणाची दखल घेतलेली प्रत्येकाला आवडत असते …

©राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील
२५/०४/२०२४

2 thoughts on “Short Connection”

  1. तुमचे लेखन खूप सुंदर आहे कारण तुम्ही नेहमी अनुभूती घेतलेला क्षण योग्य शब्दात व्यक्त करून वास्तव उभे करतात.”

    Reply

Leave a Comment