शिवाजी महाराज यांची भूमिका….गेली चारशे पेक्षा जास्त वर्ष या भूमिकेने तोंडाला रंग लावून आपली उपजीविका करणाऱ्या लोकांना जे काही मिळवून दिले आहे ना खूप असे लोक आहेत ज्यांना तर जाणीव नाही,मध्ये तर पुरंदरे याला महाराष्ट्र भूषण जाहीर झाल्यावर लोकांना महराजांपेक्षा महाराज यांना घरोघरी पोहचविणारा निवेदक मोठा वाटू लागला मी निवेदक असेच म्हणणार कारण शाहीर म्हणजे एकच बाबासाहेब देशमुख….मुळात बामणी कावा हा शब्द जेंव्हा पासून माझ्या संग्रहात आलेला आहे तेंव्हापासून मी या काव्या बद्दल नेहेमी लिहित आले आहे.अगदी सावरकर,टिळक अश्या सनातन विचारांच्या आणि ज्यांच्या विचारत स्त्री देखील एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे याला स्थान नाहीये याबद्दल मी व्यक्त होत आले आहे.हे बामणी कावेबाज लोक उठसूठ शिवाजी महाराज यांचे गुरू समर्थ रामदास कसे किंवा मग शिवाजी महाराज यांना पुरंदरे यांनी कसे घरोघरी पोहचवले याबद्दल बोलत असतात म्हणजे अगदी सतत म्हणजे त्यांना तशी संघ शाखेतून शिकवण असते.आता अलीकडे मांडलेकर नावाचे प्रकरण घशाशी आल्यावर मी शिवराय यांची भूमिका करणार नाहीये असे बोलला मग मनात विचार आला असे कोण आहेस कोण तू?….मध्यंतरी काश्मीर फाइल्स प्रचंड गाजला काश्मीर पंडित यांच्यावर कसे अन्याय झाले पहा म्हणून लोक इतक्या वर्षांनी ऊर बडवून घेत असताना कोटींचा गल्ला कोणी जमवला याची गिनती नक्कीच अंध भक्तांनी केली नाही आणि त्यावेळी केवळ जात द्वेषाचा उद्रेक निर्माण करण्यात या लोकांनी धन्यता मानली गेली …तेंव्हा त्यांना का लक्षात आले नाही की गुन्हेगार काही जात बघून नाही निर्माण होत ..आज ज्यावेळी जहांगीर नाव ठेवले म्हणून ट्रोल कसे होत आहोत याची आदळआपट करत असताना तुम्ही कलाकार म्हणून वाट्याला येणाऱ्या कोणत्याही भूमिकेबद्दल तेवढेच निरपेक्ष असले पाहिजे ना…कारण भूमिका ही भूमिका असते प्राण आणि प्रेम चोप्रा असो किंवा रावणाची भूमिका साकारलेला अभिनेता असो त्यांना कधी मी कधी अमुक एक भूमिका करणार नाही असे म्हणावे लागले नाही.मुळात शिवाजी महाराज यांची भूमिका मांडलेकर नावाच्या स्वतःला अभिनेता म्हणवणाऱ्या व्यक्तीने केली नाही तर मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीची अपरिमित हानी होणार आहे यातला भाग नाही मात्र काळ मात्र सोकावत आहे हे धूर्त लोक कसेही गल्ले आणि पोट भरतात आणि यासाठी त्यांना शिवाजी महाराज लागतातच….आता अलीकडे शिवाजी महाराज यांचे काही रामा सारखे मंदिर होणार नाहीये उत्पन्नाचे कायमचे साधन म्हणून शिवाजी महाराज आता आपल्याला सारखेच वापरता येणार नाहीत या काव्यातून किंवा हतबलते मधून मी ती भूमिका करणार नाही असे विधान आले असेल…मुळात बंद करा तुम्ही शिवाजी महाराज यांचे नाव देखील घ्यायचे असेच मला याठिकाणी म्हणू वाटते…..कारण शिवाजी महाराज म्हणजे तुझ्यासाठी असेल एक भूमिका मात्र आमच्या साठी शिवराय म्हणजे पूर्व दिशा….आणि शिवराय म्हणजे सूर्य….त्यामुळे याचे तेज तुमच्या सारखे मादुकरी मागून जगणाऱ्या लोकांना नाहीच होणार आहे शक्य …… नीट ध्यानात ठेवायचं…..तुमच्या भाषेत हा देवाच्या काठीचा आवाज असेल…लक्ष देऊन ऐक….

#म्हणे_शिवाजी_महाराज_यांची_भूमिका_करणार_नाही
#कोण_तू
#खेळ_मांडलेकर

Leave a Comment