व्यसनाधीन अस्वस्थ प्रवासी

व्यसनाधीन अस्वस्थ प्रवासी….

ही गोष्ट किंवा घटना आहे नेपाळ प्रवासातील,काठमांडू विमानतळावर सिक्युरिटी चेकिंग वेळी एका प्रवाशाला त्याच्या जवळील आक्षेपार्ह साहित्यासाठी त्याची बॅग बाजूला घेऊन त्याला ती बॅग उघडायला सांगण्यात आली.मी माझी बॅग बाजूला भरत होते त्याने आपल्या बॅग मधून एक एक बाटली काढायला सुरवात केली आता बाटली म्हणजे अर्थातच ती पाण्याची किंवा ज्युसची बाटली अर्थातच नव्हती.एक दोन म्हणता म्हणता त्याच्या साहित्यात केवळ आणि केवळ त्याच बाटल्या निघाल्या ब्रँड होता गोरखा ब्रँड….आता तुम्ही मला म्हणाल मला कसे माहीत तर बाटली म्हंटल्यावर मी पण आपृप बाईने (ही कोणती बाई) पाहिलेच की…तर अश्या बाटल्या सापडल्यावर साहजिकच त्या चेक इन बॅग मध्ये म्हणजे मोठ्या बॅग मध्ये allowed होत्या हे त्याला माहीत नसावे आणि हॅण्ड बॅग मध्ये बॉटल सापडल्यावर तो सिक्युरिटी गार्ड च्या कानात अस्वस्थपणे काहीतरी सांगत होता म्हणजे त्या बाटल्या त्याच्याकडे असू देण्याची विनवणी करत होता आणि ते गार्ड मग त्याला त्याच्या साहेबापुढे घेऊन गेले आणि तो त्या बाटल्या साठी पुन्हा तिथेही गयावया करत होता.साहजिकच नियम म्हणजे नियम असल्याने त्याला त्या बाटल्या काही परत मिळणार नव्हत्या आणि अर्थातच त्या बाटल्या त्याच्या ताब्यात हव्या असतील तर त्याला विमानात काही जागा मिळणार नव्हती पण मला वाटते नशा ही एक अशी गोष्ट असेल तिथे शहाणपणाच्या गोष्टी निरर्थक वाटू लागतात. साऱ्या जगाकडे अल्कोहोल आहे आणि  केवळ माझ्याच बॅग मधून ते बरामद होत आहे अशी भावना त्या तरुणाची होती त्याची अस्वस्थता आता रागाकडे झुकू लागली मला वाटते बहुदा त्या चार बाटल्या साठी नक्कीच विमान प्रवासावर पाणी सोडायला पण तयार झाला असेल पुढे त्याचे काय झाले मला माहित नाही.
     आपल्या देशात आपल्या देशातील वातावरण साठी अल्कोहल पेय याची काही एक आवश्यकता नाहीये माझ्या EBC ट्रेक च्या पंधरा दिवसांच्या कालावधीत मुक्कामाला पोहचल्यावर माझ्या ग्रुप मधील आठ रशियन ट्रेकर यामध्ये चार मुली होत्या  त्या अगदी रोज न चुकता बियर ऑर्डर करत होते तो ब्रँड मग लोकल असो वा आंतर राष्ट्रीय आणि अर्थातच पाणी,सोडा असा काही वापर न होता उसाचा रस आपण कसा पितो तसे ते अल्कोहल रीचवत होते,एवढे परिश्रम करून आणि तिथे एवढी थंडी असून मी बियर फुकट मिळाली तरी प्यायला तयार नव्हते याबद्दल त्यांना एवढे आश्चर्य दाटून आले होते की आपल्याकडे भगवी कपडे घातलेल्या साधूला कसा मान देतात काहीच कारण नसताना तसे मला आदर आणि मान देत होते ,अल्कोहल पोटात गेल्यावर ते काय रासायनिक क्रिया करणार आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे हे मला माहीत असल्याने मी नेहेमी खऱ्या अर्थाने पिण्याची ऑफर टेक्निकली नाकारली आणि त्यातून माझे फार काही नुकसान वैगेरे झाले नाही मला वाटते मराठी माणसाला कुठेही गेल्यावर वीरश्री अंगात संचारायला जय भवानी…जय शिवराय एवढे शब्द बास आहेत.व्यसन चांगल्या गोष्टींचे पण लागू शकते त्याने आपण अस्वस्थ नाही तर आश्र्वस्थ होतो.हे त्या अस्वस्थ व्यवसनाधीन प्रवाशाला कोण सांगेल समजावून….असो…

©राजश्री सुमन शिवाजीराव जाधव पाटील
२२/०४/२०२४

Leave a Comment